Posts

Showing posts from March, 2023

केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना 'गिफ्ट'; स्वयंपाकाच्या गॅसवर सबसिडी जाहीर, इतकी मिळणार सबसिडी

Image
भारत सरकारने शुक्रवारी देशातील ९.५९ कोटी कुटुंबांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत यावर्षीही एलिपीली सिलिंडर खरेदीवर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना एका वर्षात 12 एलपीजी सिलिंडर (14.2 किलो) वर 200 रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळेल. 1 मार्च 2023 पर्यंत 9.59 कोटी लाभार्थी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेशी जोडले गेले आहे